जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त पुरा भागात असलेल्या साईबाबा मंदिरामध्ये ग्राम विकास मंत्री यांच्या धर्मपत्नी व जामनेर शहराच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते साईबाबा ची पूजा व आरती करण्यात आली.
त्यानंतर शहरातून साईबाबांची पालखी करण्यात आली. या पालखीमध्ये नगराध्यक्ष साधना महाजन यांनी पालखीला खांदा दिला या पालखी सोहळ्यामध्ये जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील नगरसेवक बाबुराव हिवराळे अतिश झाल्टे डॉक्टर प्रशांत भोंडे रवींद्र झाल्टे सुभाष पवार कैलास पालवे यांच्यासह पदाधिकारी सामील झाले होते.
यावेळी शहरातून साईबाबा यांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक व महिला सामील झाले होते जामनेर येथे नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते आरती करून पालखी मिरवणूक काढण्यात आली.