घरात महिला एकटी… मागून त्याने मारली मिठी !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरात महिला एकटी असल्याचा फायदा घेत एकाने घरात घुसून मागून मिठी देत महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका खेडेगावात २५ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महिला ही घरी एकटी होती. या संधीचा फायदा घेत गावात राहणारा नराधम विष्णू दल्लू चव्हाण याने घरात घुसन तिच्या मुलाला महिलेकडे दिले. त्यानंतर महिलने मुलाला जवळ घेत मागे फिरताच तिच्या अश्लिल चाळे करत मिठी मारली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने आरडाओरड केली. त्यानंतर जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विष्णू दल्लू चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रियाज शेख करीत आहे.

Protected Content