चाळीसगाव,प्रतिनिधी| तालुक्यातील जामडी येथे लोकसहभागातून श्रीराम मंदिराची उभारणी होत आहे. मात्र मंदिर उभारणीबरोबर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही असे आमदार मंगेश चव्हाण यांनी भूमिपूजना प्रसंगी जाहीर केले.
चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथे लोकसहभागातून राम मंदिराचे बांधकाम सुरु आहेत. दरम्यान कोजागरी पोर्णिमा व ईद दिनानिमित हिंदू–मुस्लीम बांधव एकत्रित येऊन भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सदर भूमिपूजन हे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या पत्नी प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीराम मंदिर हे आपले प्रेरणास्थळ आहे. मंदिराच्या सभामंडप बांधकामासाठी १० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल व गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी केले. तत्पूर्वी राम मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार यांनी सपत्निक अमरसिंग जयसिंग परदेशी यांचा सत्कार केला. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, प्रतिभाताई चव्हाण, डॉ.कर्तारसिग सरदारसिग परदेशी, जिल्हा परिषद सदस्य पोपटतात्या भोळे, पंचायत समिती गटनेते संजु तात्या पाटील, पं स सदस्य सुभाष पहिलवान, दुध संघाचे संचालक प्रमोद पाडुरंग पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, नगरसेविका सविता राजपुत, नगरसेविका अलकाताई गवळी, लोकनायक महेंद्रसिग राजपुत प्रतिष्ठानच्या सुचित्राताई राजपुत, समाजसेवीका अनिताताई शर्मा, चिटणीस भाजपा वर्षाताई राजपूत, भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिलभाऊ नागरे, सरपंच राजु बापु पाटील, भाजप गटप्रमुख शिवदास महाजन, सुरेश कोडु परदेशी, डॉ.हरीश दवे, सुभाष मन्नुसिग परदेशी, पंचायत समिती सदस्य धनंजय सुर्यवंशी, मार्केट संचालक तुकाराम महाराज, राहुल पाटील यांच्यासह हिंदू मुस्लीम बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप महाराज यांनी केले.