जाती-धर्मातील विषमता मन सुन्न करणारी

मुंबई/ बीड, लाईव्ह न्युज वृत्तसेवा – राज्यात अचानक भोंग्यांच्या विषयावरुन राजकीय वातावरण तापवले जात असून जाती-धर्मात अचानक आलेली विषमता मन सुन्न करणारी आहे. यावर राजकीय नेत्यांना या विषयाला सामोरे जावे लागणार असल्याचे खा. प्रीतम मुंडे यांनी टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा निमित्त पुण्यातून घेतलेल्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याचा ३ मेपर्यंतच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केला आहे. जाती-धर्मात दुही निर्माण केली जात असून अचानक आलेली विषमता अस्वस्थ करणारी आहे. राज्यात हे निश्चितच निराशाजनक चित्र आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात तसेच अन्य समाजमनात याचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली असून राजकीय नेत्यांकडून यासंबंधी प्रतिक्रिया उमटत असताना भाजपच्या खा. मुंडे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली आहे.

Protected Content