जळगाव रूग्णालयाच्या गंभीर प्रकरणाची फाईल संबंधित विभागाकडे रवाना – डॉ. तात्याराव लहाने

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील सिव्हील रूग्णालयातील गंभीर प्रकरणाची माहितीची दखल घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनसह सात अधिकार्‍यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दिली असली तरी दरम्यान राज्याचे आरोग्य संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी अधिकाऱ्यांवर कार्यवाही होण्याबाबतची फाईल संबंधित विभागाकडे रवाना केली असल्याची माहिती ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’शी बोलतांना दिली.

आज मृत महिलेच्या प्रकरणानंतर आरोग्य विभागावर ताशेरे ओढले गेले व रूग्णालयाचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा समोर आला. दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनतातर्फे आंदोलन छेडण्यात येवून संताप व्यक्त करण्यात आला होता.

काय आहे हा प्रकार?
सदरील वृध्दा भुसावळ येथील रहिवाशी असून कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना १ जून रोजी जिल्हा कोवीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाली. २ जून रोजी स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर ३ जुन रोजी नातेवाईक तब्बेतीची चौकशीसाठी सातत्याने संपर्क साधत असतांना रूग्णालय प्रशासनाने रूग्ण उपस्थित नाही असे बेजबाबदारपणे उत्तर दिले. त्यामुळे नातेवाईकांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. रूग्णालयाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सर्व कॅमेरे बंद असल्याचे दिसून आले. त्या वृध्देस शोधने कठीण झाले होते.

दरम्यान आज ११ वाजेच्या सुमारास सदर वृध्दा ही वार्ड क्रमांक ७ मधील शौचालयात मृत आढळून आली. दरवाजाला आतून कडी लावली होती. शौचालयातून दुर्गंधी येवू लागल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला व ती महिला गेल्या दोन तीन दिवसांपासून मृत झाली असावी असा अंदाज रूग्णालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. या रूग्णालयाचा अत्यंत भोंगळ कारभार समोर आला आहे. बेफिकीरपणे रूग्णालयाचा कारभार सुरू आहे. तेथील डॉक्टर, नर्स, पोलीस, सुरक्षा रक्षक करतात तरी काय ? असा संताप कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या अनेक नातेवाईकांनी केली आहे. एवढी गंभीर घटना घडते. प्रशासन ढिम्म झाली असून रूग्णालयाचे डिन, जिल्हाधिकारी यांनी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असून याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना संबंधित वृध्देचे नातेवाईक तक्रार देणार असल्याचे कळविले आहे.

Protected Content