खगोल विज्ञान क्षेत्रामध्ये व्यक्ती कमी व संधी जास्त ; जयंत नारळीकर (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 09 15 at 7.23.22 PM

जळगाव, प्रतिनिधी | खगोल विज्ञान क्षेत्रामध्ये व्यक्ती कमी व संधी जास्त असल्याचे प्रतिपादन विख्यात खोलग शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी केले. ते रोटरी क्लब जळगाव वेस्ट व आशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी भवनात ‘गप्पा इंडियाशी’ या उपक्रमांतर्गत ‘अभ्यास : खगोल शास्त्राचा व संधी’ या विषयावर बोलत होते.

 

याप्रसंगी रोटरी वेस्टचे अध्यक्ष डॉ.सुशील राणे यांनी प्रास्तविक केले. परिचय सुजाता बोरकर यांनी तर सूत्रसंचालन प्रशांत महाशब्दे यांनी केले. आभार आशा फाउंडेशनचे गिरीश कुलकर्णी यांनी मानले. यावेळी  प्रसिद्ध  गणित तज्ज्ञ  डॉ. मंगला नारळीकर,  रोटरी वेस्टचे मानद सचिव सुनील सुखवानी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, ते जेव्हा खगोलशास्त्राचा अभ्यास करत होते तेव्हा तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. त्या काळी विदेशात उच्च शिक्षण जाण्याची क्रेझ असताना देशात राहूनच भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. भारतने इतर क्षेत्राप्रमाणेच खगोल विज्ञान क्षेत्रात आघाडी घेतली आहे. तर्कसंगत विचारांची मांडणी करता आली पाहिजे असे आवाहन श्री. नारळीकर यांनी केले. यावेळी त्यांनी गुरुत्वाकर्षण लहरी मोजण्याची माहिती दिली. दरम्यान, प्रारंभी त्यांनी सर्व प्रयोग वापरून प्रात्यिकासह एक गणित सिद्ध करून दाखविले. विद्यार्थ्यांना त्यात चूक शोधण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. अमेय जोशी, डॉ. संजय हुजूरबाजार यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना १५ विज्ञान वरचे प्रश्न विचारण्यात आले होते. यापैकी १३ प्रश्नाची अचूक ८ वीतील विद्यार्थी पारस कुलकर्णी याने दिल्याने त्याचा सत्कार करण्यात आला. गप्पा इंडिया या अंतर्गत त्यांनी विद्यार्थ्याच्या शंकांचे निरसन केले.

Protected Content