अमळनेर येथून हरवलेला मुलगा पालकांच्या स्वाधीन

Police logo

अमळनेर प्रतिनिधी । कटींग करून येतो असे सांगून गेलेला शहरातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्ती फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेवून पालकांच्या स्वाधीन केले.

याबाबत माहिती अशी की, अमळनेरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास पालकांना कटींग करून येतो असे सांगून घरातून गेला. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने पालकांनी नातेवाईकांकडे शोध घेतला तरी मिळून आला नाही. याप्रकरणी अमळनेर पोलीसात भाग-५ गुरनं १८२/२०१९ भादंवि ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक डॉ. उगले, अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांना गुप्त माहितीनुसार सदरील अल्पवयीन मुलगा हा पुण्यातील पिंप्री चिंचवड भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना सुचना दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ विजय देवराम पाटील, नरेंद्र वारुळे, अमळनेर पोलीस स्टेशनचे पोना. सुनिल पाटील यांना पाठवून अल्पवयीन अल्पवयीन मुलगा पुणे येथील चिंचवड भागातील भूमकर चौक परिसरातून ताब्यात घेतले. मुलाला अमळनेर येथे आणून त्याचे पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content