जळगाव जिल्हा बस ओनर्स असोसिएशनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये वाहतूकदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विविध मागण्याचे निवेदन जळगाव जिल्हा बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात २१ मार्च पासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूकदारांची आवक पुर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे वाहतूकदारांवर अवलंबून असलेल्या चालक, क्लिनर यांच्यासह कार्यालयीन सहकारी वर्गाला आर्थिक फटका बसला आहे.

या आहे मागण्या
बस चालक अधिकप्रमाणावर कर भरत असल्याने किमान एक वर्षाचा रोडवरील कर माफ करण्याचा यावा. बसेसचा इन्सूरन्स पुढील सहा महिन्याकरीता वाढवून मिळावा. बस मालकांना व्यवसाय ऊभारणीसाठी बस वाहतूकदारांना अर्थिक पॅकेज सरकारने जाहीर करावे. बँकांचे कर्जावरील सहा महिन्याचे व्याज माफ करण्यात यावे. बस कार्यालयातील कामगार व इतरांना आर्थिक मदत देण्यात यावी. सरकारने पेट्रोल व डिझेलवरचा अतिरिक्त भार ताबडतोब रद्द करावा. किमान एक वर्षाचा टोल खाजीगी बसेससाठी माफ करून व्यवसाय पुर्ववत येण्यासाठी मदत करावी. किमान एक वर्षाचा जीएसटी माफ करण्यात यावा. आणि बस कर्मचाऱ्यांना कोरोनायोध्दा घोषीत करून ५० लाख रूपयांचा विमा संरक्षण म्हणून जाहीर करण्यात यावा तसेच ५० टक्के प्रवाशी वाहतूकीस परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशा विविध मागण्या मान्य कराव्या अशी मागणी जळगाव जिल्हा बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. या निवेदनावर मुकेश बेदमुथा, प्रकाश सपकाळे, सुशिल नेरकर, बिपीन भिल, प्रमोद झांबरे, सौरभ पाटील, मुकेश बनसोडे, हर्षल देशमुख, योगेश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content