जनतेच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत

जळगाव प्रतिनिधी । जनता कर्फ्यूच्या कालावधीत जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून २४ तास सुरू असणारा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जळगाव शहरात काल रात्री आठ वाजेपासून जनता कर्फ्यू सुरू करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सेवांचे अपवाद वगळता संपूर्ण बाजारपेठ आणि अन्य सेवा बंद राहणार आहेत. या कालावधीत नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, जनता कर्फ्यूच्या कालावधीत जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून चोवीस तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ०२५७-२२१७१९३/२२२३१८० या क्रमांकावर तर पोलीस मुख्यालयातील ०२५७-२२२३३३३/२२३५२३२ या क्रमांकावर नागरिक कॉल करून अडचणींचे निरसन करू शकतात.

Protected Content