जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 21 हजार कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबचे घेतले नमुने

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी आतापर्यंत (2 जुलैपर्यंत) 20 हजार 874 कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 16 हजार 356 तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 3 हजार 798 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवाय इतर अहवालाची संख्या 267 असून अद्याप 453 अहवालांची तपासणी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

 

जिल्ह्यात सध्या 1282 ॲक्टीव्ह रुग्ण 

जिल्ह्यात सध्या ॲक्टीव्ह असलेल्या 1282 कोरोना बाधित रुग्णांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे 204, गोदावरी हॉस्पिटल येथे 69, गणपती हॉस्पिटलमध्ये 30, गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये 45, उप जिल्हा रुग्णालय, चोपडा येथे 25 असे एकूण 373 रुगण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये तर 59 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर व 850 रुग्ण हे जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहे. यामध्ये जळगाव शहर 326, जळगाव ग्रामीण 56, भुसावळ 87, अमळनेर70, चोपडा 69, पाचोरा 31, भडगाव 77, धरणगाव 55, यावल 83, एरंडोल 79, जामनेर 105, रावेर 95, पारोळा 33, चाळीसगाव 19, मुक्ताईनगर 26, बोदवड 66, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेले 5 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2270 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात करण्याता आलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आतापर्यंत 2270 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये जळगाव शहर 426, जळगाव ग्रामीण 68, भुसावळ 302, अमळनेर 243, चोपडा 176, पाचोरा 59, भडगाव 153, धरणगाव 104, यावल 129, एरंडोल 92, जामनेर 87, रावेर 166, पारोळा 194, चाळीसगाव 27, मुक्ताईनगर 19, बोदवड 20, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेले 5 रुग्णांचा समावेश आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत आढळले 3798 कोरोना बाधित रुग्ण

जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3798 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 796, जळगाव ग्रामीण 133, भुसावळ 435, अमळनेर 342, चोपडा 263, पाचोरा 97, भडगाव 234, धरणगाव 177, यावल 228, एरंडोल 177, जामनेर 206, रावेर 284, पारोळा 230, चाळीसगाव 50, मुक्ताईनगर 48, बोदवड 88, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 10 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 799 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 799 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 276, शहरी भागातील 337 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 186 ठिकाणांचा समावेश आहे.

 

प्रतिबंधित क्षेत्राचे सर्व्हेक्षणासाठी जिल्ह्यात 1975 टिम कार्यरत

कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्राचे सर्व्हेक्षणासाठी जिल्ह्यात 1975 टिम कार्यरत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 615, शहरी भागातील 854 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 506 टिम घरोघरी जाऊन तसेच नागरीकांची तपासणी करीत आहेत. या टिमच्या माध्यमातून जिल्हाभरात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 335 घरांचे तर 6 लाख 64 हजार 479 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यापैकी 2 लाख 5 हजार 692 लोकसंख्या ग्रामीण भागातील तर उर्वरित लोकसंख्या नगरपालिका, नगरपंचायत व महापालिका क्षेत्रातील आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 246 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. यापैकी 80 टक्केपेक्षा अधिक रुग्ण हे 50 वर्षावरील तसेच त्यांना जुने आजार, विविध व्याधी असल्याचेही निदान झाले आहे. जिल्ह्यात सध्या संशयित रुग्ण शोध मोहिम सुरु असल्याने नागरिकांनी आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे. तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित रहावे. अनावश्यक गर्दी टाळावी. सुरक्षित अंतर राखावे. मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Protected Content