जळगावात रात्री दार उघडे पाहून भूरट्यांनी लांबविल्या वस्तू

जळगाव प्रतिनिधी । घराच्या दरवाजात कुलर लावून झोपलेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पैशांचे पाकिट, मोबाईल आणि एलईडी टिव्ही चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सध्या रखरखते उन आहे, तापमानाने ४५ अंशाची पातळी गाठली आहे. उकाळ्यामुळे नागरीक हैराण झाले असून अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे उकाळ्यापासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून रात्रीच्या वेळी काही नागरीक अर्धवट दरवाजा उघडे ठेवून झोपणे पसंत करत आहे. त्याच्याच फायदा काही भुरटे चोर घेत आहे. अशी घटना शहरातील लक्ष्मीनगरात घडली आहे.

गणेश बळीरात सपकाळे (वय-३८) रा. लक्ष्मी नगर, श्रीराम कन्याशाळेजवळ हे रात्री १० वाजेच्या सुमारास जेवण करून कुलर लावून झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात चार्जिंगला लावलेला ८ हजाराचा मोबाईल, १२ हजार रूपयांचा एलईडी टीव्ही आणि पाकीटात ठेवलेले ९७० रूपये चोरी झाल्याचे लक्षात आले. घरातील मंडळींना विचारणा केली असता त्यांना देखील याबाबत माहिती नसल्याचे समाजले. एमआयडीसी पोलीस अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content