जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील रेल्वेस्थानकासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते गुरूवारी १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने जळगाव शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरूवारी १४ एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. दरम्यान, कॉंग्रेस महानगर अध्यक्ष श्याम तायडे व पदाधिकारी यांनी अभिवादन केले. यासोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी देखील अभिवादन केले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन सभा घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व व्यक्तिमत्व महान आहे. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आणि कार्य आजच्या पिढीला समजले पाहिजे. लहान घटना ह्या माणसाला मोठे करून जाते. त्यामुळे आजची जयंती नुसती साजरी करायची नाही. त्यांनी केलेल्या संघर्षाची आठवण आपण मनात ठेवून जीवनाची यशस्वी वाटचाल करावी असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्याला उजाळा देत येणाऱ्या पिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. यावेळी जळगाव रेल्वे स्थानकाच्या आवारात सरबत वाटप, अन्नदान, रक्तदान शिबीर यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष मुकुंद सपकाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अॅड. राजेश झाल्टे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, छावा जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1406397576493642
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/413534250584164