Home क्राईम खरेदीसाठी आलेल्या तरुणाची बाजारातून दुचाकी लांबविली

खरेदीसाठी आलेल्या तरुणाची बाजारातून दुचाकी लांबविली

0
100


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील दाणाबाजारातून तरुणाची ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील संदीप दगडु बादांदडे वय २८ हा तरुण ९ एप्रिल रोजी जळगाव शहरातील दाणाबाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी आला होता. यादरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याने त्याची एम. एम. २० एफ.आर. ४२५४ या क्रमाकांची दुचाकी दाणाबाजारातच खैरनार ऑप्टीकल्स समोर चिंचेच्या झाडाखाली उभी केली. काम आटोपून दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास परतल्यावर दुचाकी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेतला दुचाकी मिळून आली नाही. अखेर दोन दिवसांनंतर संदीपने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound