जळगाव प्रतिनिधी । जळगावात आज दोन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यात जोशी पेठ व जिल्हा पेठीतील रूग्णांचा समावेश आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा माहिती कार्यालयाने आज सकाळी जाहीर केलेल्या अपडेटमध्ये जळगावात दोन कोरोना बाधीत रूग्ण आढून आले आहेत. यात जोशी पेठेतील महिला व जिल्हा पेठेतील पुरूषाचा समावेश आहे. यामुळे आता जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २३७ झालेली आहे. त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकोणतीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. तर, सध्या १८३ रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. जोशी पेठेत कोरोनाचे अनेक रूग्ण आढळून आले असून ही महिला त्यांच्याच संपर्कात आल्याने बाधीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शहरातील जिल्हा पेठ भागातही आता कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे.