रेल्वे स्थानकांवर मिळणारी गुगलची फ्री वायफाय सेवा होणार बंद

google wifi

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुगलकडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत वायफायची सेवा आता कायमची बंद होणार आहे.

 

गुगलने मोफत वायफाय सेवा पुरवणारा गुगल स्टेशन हा प्रकल्प भारतासह अन्य देशांमध्येही बंद करत असल्याची घोषणा सोमवारी केली. देशात आपली ऑनलाइन ओळख निर्माण करणे सोपे झाले असून इंटरनेटही स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता ‘स्टेशन’ सेवेची आवश्यकता उरली नसल्याचे कारण गुगलने दिले आहे. सन २०१५मध्ये गुगलने भारतीय रेल्वे आणि रेलटेल यांच्यासमवेत मोफत सार्वजनिक वायफाय सेवा देणारी ‘स्टेशन’ ही सेवा सुरू केली होती. गुगलने हा प्रकल्प बंद केल्यानंतरही भारतात रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फायची सेवा सुरूच असेल अशीही चर्चा आहे.

Protected Content