जळगाव प्रतिनिधी । मेहरुण तलाव परिसरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात अंधारात लपुन बसलेल्या दहा जणांना शास्रसह अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे
याबाबत माहिती अशी की, मोहनसिंग जगदीशसिंग बावरी (वय १९), मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (वय २१, दोघे रा.शिरसोली नाका), रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (वय २१, रा.तांबापुरा), पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे (वय २२), सनी उर्फ फौजी बालकिसन जाधव (वय २२), रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय १९), खुशाल उर्फ काल्या बाळु मराठे (वय २४, चौघे रा.रामेश्वर कॉलनी), टीपु उर्फ बहिऱ्या सलीम शेख (वय २२, रा.तांबापुरा) व गुरूजितसिंग सुजानसिंग बावरी (वय २०, रा.शिरसोली नाका) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
शनिवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून हद्दीत कोम्बींग ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी मेहरुण तलाव परिसरात १० ते १२ जण अंधारात लपुन बसले आहेत. त्यांच्याकडे शस्त्र असून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात आहे अशी माहिती ठाणे अंमलदार दिनकर खैरनार यांनी पहाटे पाच वाजता वॉकीटॉकीने पथकांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक रणजीत शिरसाठ, उपनिरीक्षक संदीप पाटील, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, सचिन पाटील, मुदस्सर काझी, सचिन चौधरी, गोविंदा पाटील, नितीन पाटील, अशोक सनकत यांच्या पथकांनी दोन गट तयार केले. हे दोन्ही गट तलावाच्या दोन बाजुने पहाटे पाच वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात पोहोचले. यावेळी तेथु लपुन बसलेल्या या नऊ संशयितांना पोलिसांनी अटक केली. यातील एकाने पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्याना पाठलाग करुन पकडण्यात आले. या संशयितांकडून सोनेरी रंगाचे गावठी पिस्तूल, दोन चॉपर, लोखंडी टॉमी, मिरची पुड, दोन लाकडी दांडे, मोबाईल, नॉयलॉनची दोरी, आसारी, दुचाकी (एमएच १९ सीएच ११११) या वस्तु, शस्त्र मिळुन आले आहे. दुचाकी व शस्त्रांची किंमत १ लाख १६ हजार ५०० रुपये ऐवढी आहे. पोलिस कर्मचारी योगेश बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयितांना शस्त्रांसह अटक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल आला आहे.