झोमॅटो कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणात काम मिळेल याची खात्री वाटत नाही. त्यामुळे कंपनीतील 13 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात येणार आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी असे म्हटले की, कंपनीच्या नेतृत्व टीमकडून झूम कॉल कडून निमंत्रण दिले जाणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलेले नाही पण त्यांच्यासाठी कंपनीकडे काम नाही आहे अशांना फक्त ५० टक्के पगार देण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी आपला पूर्ण वेळ आणि नवी उर्जा शोधण्यासाठी कामी लावावी. कंपनी जून महिन्यापासून सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करणार आहे.

Protected Content