दिलासादायक : मालेगावात एकाच दिवसात तब्बल ५१ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त

मालेगाव (वृत्तसंस्था) मालेगावात एकाच दिवसात तब्बल ५१ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४२८ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.

 

एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण बरे झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मालेगावातील ९३ अहवाल आले असून यातील ९० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मालेगावात आतापर्यंत एकूण ६०५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावातून मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Protected Content