जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा शाळेकडे जाणाऱ्या रस्तालगत असलेल्या विहिरीत ६२ वर्षीय व्यक्तीने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हे हिल्स परीसरात राहणारे लक्ष्मण धोंडू सोनवणे वय 62 रा. लक्ष्मीनगर हे दोन मुले व पत्नी तसेच नातवंड, सुना या कुटुंबासह वास्तव्यास होते. शनिवारी सकाळी लक्ष्मण सोनवणे हे सकाळी 7 वाजता घरात नसल्याने त्यांचे पत्नी शोभा यांच्या लक्षात आले. त्यांनी मुलगा सागर यास वडिलांचा शोध घेण्यास सांगितले. सागर हा परिसरात वडीलांचा शोध घेत असतांना एका तरुणाने त्याला याच परिसरात जाणता राजा शाळेकडे जाणार्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत एक नागरिकाचा मृतेदह असल्याची माहिती दिली. सागरसह कुटुंबियांनी विहिरीकडे धाव घेतली असता विहिरीत पडलेले व्यक्ती हे लक्ष्मण सोनवणे असल्याचे समोर आले. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, सतीश हाळनोर, उमेश भांडारकर, विलास पाटील, विजय दुसाने यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.. पोलिसांनी याच परिसरातील नागरिक तसेच तरुणाच्या मदतीने मोठा दोर बांधून खाट विहिरीत सोडली. व मृतदेह बाहेर काढला. zयानंतर येथील तरुण विहिरीत उतरला. मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.
लक्ष्मण सोनवणे यांना सचिन व सागर अशी दोन मुले आहे. दोघे विवाहित आहेत. सचिन हा जैन इरिगेशन कंपनीत कामाला आहे. घटना समोर आली त्यावेळी तो कंपनीत होता. सागर हा सुध्दा जैन इरिगेशनमध्ये होता, मात्र काही दिवसांपासून घरीच आहे. लक्ष्मण सोनवणे हे मनोरुग्ण असल्याने १० ते १५ वर्षापासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरु होते, अशी माहिती त्यांचा मुलगा सागर सोनवणे याने बोलतांना दिली. याप्रकरणी तालुका पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते.