जळगावातील उद्योजकाची तब्बल 55 लाखांची फसवणूक; गुजरातमधील दोन कंपन्यांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । एका महिन्याच्या आत मालाची रक्कम देण्याचे आमिष दाखवत गुजरात राज्यातील  वेगवेगळ्या दोन कंपन्यांनी सुमारे 55 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी खान्देश मिल परिसरातील एका कंपनीच्यातक्रारीवरून शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव एमआयडीसी भागातील रिषभ मेटल्स ॲण्ड केमिकल्स ही विविध प्रकाराची रसायने प्रक्रिया करून विक्री करणारी कंपनी आहे. हीचे खान्देश मिल्स कॉम्प्लेक्स येथे कार्यालय आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील रंजनी डायस्टाफ ॲण्ड केमीकल कंपनीचे मनोज दुबे यांनी रिषभ मेटल्स कंपनीशी संपर्क साधून तीस दिवसांच्या आत मालाची रक्कम देवू असे सांगून उधारिने रसायनाची मागणी केली होती. त्यानुसार १० एप्रिल २०१९ ते १७ ऑगस्ट २०१९ या कालावधीत रिषभ मेटल्सने कंपनीने दुबे यांना १० लाख ९८ हजार २१२ रूपयांच्या रसायनांचा पुरवठा केला. मात्र, अनेक महिने उलटूनही पैसे मिळाले नाही. मनोज दुबे याच्याविरूध्‍द तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

दुसऱ्या घटनेतील अहमदाबादेतील नॅरोल टेक्सटाईल इन्फ्रास्ट्रक्टचर ॲण्ड एनव्हिरो मॅनेजमेंट कंपनीने सुध्‍दा शहरातील रिषभ मेटल्स कंपनीकडे सुमारे ४४ लाख ९ हजार २३४ रूपयांच्या रसायनांची मागणी केली होती. तीस दिवसात मालाची रक्कम देण्‍यात येईल, असेही या कंपनीकडून सांगण्‍यात आले होते. मागणीनुसार २१ जुलै २०१९ ते २१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत रिषभ मेटल्स कंपनीकडून रसायने पुरविण्‍यात आली. मात्र, अनेक महिने उलटून सुध्‍दा या कंपनीकडून पुरविलेल्या मालाची रक्कम देण्‍यात आली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे कळताच, शुक्रवारी रिषभ मेटल्स कंपनीचे विधी अधिकारी ज्ञानदेव वाणी यांच्या फिर्यादीवरून नॅरोल टेक्सटाईल इन्फ्रास्ट्रक्टचर ॲण्ड एनव्हिरो मॅनेजमेंट कंपनीचे संचालक नितीन ठक्कर, शंकरभाई पटेल, देवकीनंदन अग्रवाल, जयप्रकाश चिरीपाल, ललितमोहन चमारिया, नरेशकुमार शर्मा, डॅनिअल रिचर्ड (अखिलेश्वर सिंग), कमलाकुमार दयानी, आशिष शाह यांच्याविरूध्‍द ४४ लाख ९ हजार २३४ हजार रूपयात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Protected Content