केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी  संचलित अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.

डॉ.  कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  प्राचार्य डॉ संजय  सुगंधी, अकॅडेमिक डायरेक्टर संजय दहाड, अकॅडेमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, डॉ.  एपीजे अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक प्रा. संजय पावडे, प्रा. केतन जाधव, प्रा. तुषार चौधरीप्रा. नितीन मटकरी आदींनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. 

याप्रसंगी बोलताना प्रा. नितीन मटकरी यांनी डॉ. कलाम यांचे विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांच्या विचारांना कृतीची जोड द्या. असे आवाहन केले.  राष्ट्रपुरुषांच्या विचारात देश घडविण्याची क्षमता असते म्हणून त्यावर प्रत्यक्ष कृती होणे गरजेचे आहे.  विद्यार्थ्यांनी  डॉ.  कलाम यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणावे तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असेही त्यांनी सांगितले. डॉ.  कलाम यांचे विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रातील अतुलनीय कार्याची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी डॉ. कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर, अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content