जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर ट्रकने दुचाकीस्वारला चिरडल्याची घटना आज रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. अपघात झाल्यानंतर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
या संदर्भात अधिक असे की, जळगाव एमआयडीसी भागात राहणारे नगिन सकरू राठोड (वय ३८) आणि उदय गजाजन राठोड (वय ४०) हे दोघं जण सुनसगाव येथे कामानिमित्त गेले होते. आज रात्री ८ वाजेच्या सुमारास ते दुचाकीने अजिंठा चौफुलीवर थांबले. यानंतर आकाशीवाणीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक (क्र.एमएच ४०, बीजी ८९१५) ने त्यांना जोरदार धडक दिली. यात नगिन ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे जागीच ठार झाला तर उदय गंभीर जखमी झाला आहे. दोघं जण बांधकाम आणि भंगार व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले होते. वाहतूक कोंडी झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.