जळगावकरांसाठी ‘रिक्षा ऑन कॉल’ची सुविधा

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक गरज असल्यास जळगावकरांसाठी ‘रिक्षा ऑन कॉल’ची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना परवानगी नसल्याने नागरीकांची अडचण होवू नये तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे याकरीता शहरात ‘रिक्षा ऑन कॉल’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळात इतर वाहनांवर बंदी असल्याने अत्यावश्यक सेवेवर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर जाताना तसेच रुग्णांना दवाखान्यात जाताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने यावर उपाय म्हणून जळगाव शहरात रिक्षा ऑन कॉल हा उपक्रम राबविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी परिवहन विभागास दिल्यात. त्यानुसार परिवहन विभागाने पहिल्या टप्प्यात शहरात 25 रिक्षांना परवानगी दिली आहे. ज्या नागरीकांना रिक्षाची आवश्यकता असेल त्यांनी कैलास विसपुते मोबाईल क्रमांक 9028212102, दिनेश भावसार क्रमांक 7058789854, विलास ठाकूर 7741921439 या क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबत काही अडचण आल्यास नागरीकांना परिवहन विभागाच्या कंट्रोल रुमला कॉल करता येईल. कंट्रोल रुमचा क्रमांक 0257/2261819 असा आहे.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी एकावेळी रिक्षात एकाच प्रवाशास प्रवास करता येईल. तर वैद्यकीय उपचारासाठी रुग्णास घेऊन जावयाचे असल्यास रुग्णासोबत अजून एका व्यक्तीस प्रवास करण्यास परवानगी राहील. शहरातील नागरीकांना अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच घराबाहेर पडावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content