शॉकींग : जिल्ह्यात सात नवीन कोरोना बाधीत रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून जिल्ह्यात एकूण सात नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

जळगाव जिल्ह्यात काल रात्री चार तर आज सकाळी दोन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आज रात्री एकूण ५४ चाचणीचे अहवाला प्राप्त झाले असून यातील सात रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांपैकी 54 व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यापैकी सात रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 47 संशयित रूग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोना बाधित सात रूग्णांपैकी चार रूग्ण अमळनेर चे असून जळगाव, पाचोरा व भुसावळच्या प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. हे सर्व रूग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या एकतीस इतकी झाली आहे.
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content