चाळीसगाव प्रतिनिधी । येथील कालकथित विमलबाई भगवान बागुल यांचा जलदान विधी साधेपणानेने साजरा करून त्यातील वाचलेली ११ हजार रूपयांची रक्कम त्यांचे चिरंजीव धर्मभूषण बागुल यांनी मुख्यमंत्री सहाय्यात निधीत दिली आहे.
समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक, भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय प्रचारक आणि विश्वशांती फाऊंडेशनचे अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या मातोश्री विमलबाई भगवान बागुल यांचे दिनांक ९ मे रोजी निधन झाले. त्यांच्या जलदानाचा विधी १३ मे रोजी झाला. सध्या सुरू असणार्या कोरोनाच्या आपत्तीमुळे हा दिवस अतिशय साधेपणाने व मोजक्या आप्तांच्या उपस्थितीत झाला. दरम्यान, या विधीचे वाचलेले ११ हजार रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय धर्मभूषण बागुल यांनी घेतला. या अनुषंगाने आज तहसीलदारांना अकरा हजार रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. जलदान विधीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याच्या धर्मभूषण बागुल यांच्या निर्णयाचे सर्व समाजांमधून कौतुक होत आहे.