जनता कर्फ्यूत नियमांचा भंग करणार्‍यांवर कारवाई ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता काल मध्यरात्रीपासून चार दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू झाला असला तरी अनेक नागरिक आज रस्त्यांवर दिसून आले आहेत. यामुळे प्रशासनातर्फे कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भुसावळ शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४० झाली असल्याने काल सायंकाळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मध्यरात्रीपासून चार दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आले. या अनुषंगाने आज सकाळपासून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जनता कर्फ्यूतही काही नागरिक रस्त्यावर फिरतांना आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईस प्रारंभ करण्यात आला आहे. अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी जामनेर रोडवरील बॅरिकेडसला भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. याप्रसंगी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे. तहसीलदार दीपक धीवरे, मुख्याधिकारी करूणा डहाळे, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलीस निरिक्षक दिलीप भागवत आदी उपस्थित होते.

खालील व्हिडीओत पहा भुसावळातील जनता कर्फ्यूसाठी प्रशासनाची तयारी.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/845407982612688

Protected Content