जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील हॉटेल सुमेरसिंग ढाब्यात जेवणासाठी आलेल्या तरूणाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना शनिवार १३ फेब्रुवारी रोजी घडली होती. या गुन्ह्यातील दुचाकी चोरुन नेणाऱ्या भामट्याचा मुक्ताईनगर येथे अपघात झाल्याच्या गुप्त माहितीवरुन जखमी संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, सम्राट कॉलनीतील रहिवासी भिमराव सुकलाल बारी (वय-३३) हे एमआयडीसीत खासगी कंपनीत नोकरीला आहे. शनिवार (ता.१३) रोजी मित्रांसोबत जेवणासाठी हॉटेल सुमेरसिंग येथे गेले असता अज्ञात चोरट्याने बाहेर पार्कींग मध्ये उभी दुचाकी लंपास केली होती. एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद होवुन संशयीताचा शोध सुरु असतांनाच हि दुचाकी प्रसाद जयराज पाटिल(वय-२१) याने चोरुन नेली असून याच चोरीच्या दुचाकीने मुक्ताईनगर कडे जातांना त्याचा अपघात झाल्यांची माहिती निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यावर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी चेतन सोनवणे सचिन मुंडे सचिन पाटील यांनी प्रसाद जयराज पाटिल याला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरुन नेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.