Home Cities जळगाव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला अभिवादन

0
33


 

जळगाव, प्रतिनिधी । अपंग सेवा मंडळ संचलित मूकबधिर विद्यालय जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला संघर्ष अपंग  कल्याण बहुद्देशीय संस्था जळगावतर्फे गुरुवार १८ फेब्रुवारी रोजी शिवरायांना अभिवादन करण्यात आले. 

अपंग सेवा मंडळ संचलित मूकबधिर विद्यालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुनील भैया माळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. व मूक बधिर दिव्यांग विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आले.  यावेळी मुख्याध्यापक एकनाथ पवार, विशेष शिक्षक नीता सोमाणी, शेख निशान, संघर्ष अपंग संस्था अध्यक्ष गणेश पाटील, किशोर नेवे, जितेंद्र पाटील,  राजेंद्र वाणी, संतराम एकशिंगे, दत्तू भदाणे, रवींद्र शिंदे आशा पाटील, मनीषा दळवी, संगीता प्रजापत आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound