रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चीनावल परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची व संसाधांची होत असलेली चोरी व जाळपोळ करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकारास आळा बसवावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनाचा आशय असा की, शेतकरी वर्ग अहोरात्र आपल्या घामाने शेती सिंचून कष्टाची भाकर खात आहे. कोरोनाचे संकट डोक्यावर असून पण शेतकरी जोमाने काम करतं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हाथ भार लावत आहे. अश्या परिस्थितीत शेतकरी आपला माल उघड्यावर्ती ठेवून आपल्या शेतमालाचा सट्टा लावत आहे. अश्या परिस्थितीमध्ये जर शेतकरी वर्गाचा माल आणि संसाधनांची हानी काही गुंड प्रवृत्तीचे लोक करीत असतील तर त्यांना त्वरित आळा घाला नाहीतर आजचे निवेदन उद्याच्या आंदोलनमध्ये बदल करेल असा ठोक इशारा आज प्रहार जनशक्ती पार्टी रावेर शहर यांनी दिला याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेन्द्र रामदास महाजन, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश चींधू पाटील, युवक जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे, तालुका उपाध्यक्ष प्रहार राजेन्द्र प्रकाश पाटील, तालुका सचिव प्रहार मच्छिंद्र कोळी, शहर उपाध्यक्ष मनोज वरणकर, महेश सोनवणे , प्रदीप महाजन आदी प्रहार परिवार उपस्थीत होत.