चोरल्या गेलेल्या वस्तू मिळाल्या परत; फिर्यादींनी मानले पोलिसांचे आभार

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा सिटी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरलेली मोटर सायकल व डी फ्रीज पारोळा पोलिसांनी फिर्यादींना दिली आहे. याप्रसंगी आपल्या चोरल्या गेलेल्या वस्तू परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

पोलिसांनी बकऱ्या, बैल व इतर शेतीचे साहित्य चोरणारे चोरटे पकडून एकूण १८ गुन्हे उघडकीस आणलेले होते. त्यामध्ये पारोळा, अमळनेर, धरणगाव, चोपडा सिटी जळगाव तालुका अशा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोऱ्या केलेल्या होत्या या घटनांमाधील ८ चोरट्यांना अटक करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

त्यापैकी चोपडा सिटी पोलीस स्टेशन येथून चोरी गेलेला डी. फ्रीज व बजाज प्लॅटिना मोटर सायकल जप्त करण्यात आले होते. यातील फिर्यादी प्रवीण नारायण बाविस्कर रा. वेले ता चोपडा यांना त्यांचा डी फ्रीज व विजय धनराज पाटील रा. आडगाव ता. चोपडा यांना त्यांची चोरी गेलेली मोटर सायकल असा मुद्देमाल ओळख सत्र पूर्ण झाल्यावर चोपडा सिटी पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार पोना मधुकर पवार यांनी त्यांना त्यांच्या ताब्यातील वस्तू दिल्या. याप्रसंगी आपल्या चोरल्या गेलेल्या वस्तू परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शन खाली पो ना सुनील वानखेडे, पो ना प्रवीण पाटील व डिटेक्शन पथकाने कारवाई केली असून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व मुद्देमाल कारकून पो ना आम्रपाली पालवे यांनी मुद्देमाल परत दिला आहे.

Protected Content