स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वामी समर्थ सेवा केंद्राच्यावतीने यावल तालुक्यातील विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व नाडी परिक्षण शिबीरास सुरूवात झाली या शिबीरांना नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

यावल तालुक्यात ११ सप्टेंबर रोजी नायगाव येथील ग्राम पंचायतच्या कार्यालयात या आरोग्य तपासणी शिबीराची सुरूवात झाली. १२ सप्टेंबर किनगाव येथील कौशल्यदास महाराज मठ येथे , १३ सप्टेंबर रोजी दहिगाव तालुका यावल येथील श्री मारोती मंदीर, १४ सप्टेंबर रोजी डोंगर कठोरा येथे मंदीरात , १५ सप्टेंबर रोजी यावल येथील माधव नगर, टेलीफोन ऑफीस जवळ , श्री स्वामी समर्थ केन्द्र भुसावळ रोड यावल, १६ सप्टेंबर रोजी भालोद येथील पंचवटी मंदीर तर १७ सप्टेंबर रोजी सांगवी येथे श्री स्वामी समर्थ केन्द्र ,भास्कर नगर या ठिकाणी आयोजीत करण्यात आले आहे.

तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार, मधुमेह , ब्लडप्रेशर, कावीळ , पोटाचे विकार , अॅनिमिया,संधीवात , मनोविकार , मुतखडा , स्त्रियांचे आजार , त्वचा विकार , मुळ्व्याध, लहान मुलांचे आजार , कॅन्सर आदी आजारांवर मोफत उपचार केले जाणार आहे . या संधीचा तालुक्यातील सेवेकरी व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ केन्द्र ( दिंडोरी प्रणीत ) यावल यांच्या वतीने करण्यात आले आहे .

Protected Content