चोपडा प्रतिनिधी । कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे केंद्र व राज्य सरकार गैरफायदा घेत कामगारांचे कामाचे तास ८ वरून १२ तास करीत आहे. या निर्णयाचा देशव्यापी निषेध २२ रोजी घेण्यात आला. चोपडा तालुक्यातील आयटकतर्फे पंचायत समिती कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. आयटकतर्फे विविध फलक घेवून आशा आंगणवाडी, ग्रामपंचायत मनरेगा, शालेय पोषण आहार या संदर्भात निषेध करण्यात आला.
लॉकडाऊन काळातील वेतन कामगारांना द्यावे तसेच कोणतीही कामगार कपात करण्यात येऊ नये. तसेच रोजचे उत्पन्न बंद झालेल्यांना घरी बसल्या कालात वेतन द्यावे व या कामगारांचे घरभाडे घेऊ नये या मोदी सरकारच्या आदेश बहुसंख्य घरमालक उद्योगपती यांनी कचऱ्याच्या टोपलीत फेकला. व भाडे मागत आहेत. दुसरीकडे पंतप्रधानांनी जाहीर केलेले २० लाखाचे पॅकेज हेही फसवे आहे. कामगारावर हायर-फायर ही व्यवस्था लादण्यात येत आहे. अशा निर्णयानतून भारतीय कामगार वर्गाला ब्रिटिश कालीन आद्य कामगार नेते नारायण लोखंडे याच्या समकालीन परिस्थितीमध्य कामगारांचे जशी शोषण व्यवस्था होती त्या व्यवस्थेत सरकार आणून सोडत आहे केंद्र व राज्य सरकारांनी कामगार विरोधी धोरणे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा आयटकने दिला आहे.
आंदोलनात यांनी घेतला सहभाग
अमृत महाजन, ममता महाजन, मीनाक्षी सोनवण, ललित पाटील, सुलोचना पाटील, वत्सला पाटील, विद्यादेवी बाविस्कर, अनिता पाटील, माया पाटील, रेखा पाटील, सिंधू पाटील, शालिनी पाटील, शितल सुर्यवंशी, हिराबाई महाले, निताई बाला, बंगाल सुमन पांडे, बंगाल महेंद्र धनगर आदी अंगणवाडी आशा, शालेय पोषण आहार, मनरेगा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, लॉकडाऊनमध्ये अडकलेले प्रतिनिधींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.