चोपडा येथील डॉ.राहुल पाटील यांना राज्यस्तरीय रक्तमित्र पुरस्कार

चोपडा (प्रतिनिधी) । डॉ. राहूल पाटील यांना पुण्यातील स्व.रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टचा रक्तमित्र 2018-19चा राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणी यांच्याहस्ते देण्यात आला. स्वर्गीय रोहिणी जाधव स्मारक ट्रस्ट मागील 23 वर्षापासून रक्तदान क्षेत्रात रक्तदान क्षेत्रातील रक्तमित्र व रक्तदाता पुरस्कार तसेच एड्स जनजागृती पुरस्कार व निसर्ग पर्यावरण मित्र पुरस्कार असे एकूण चार पुरस्कारांचे सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवी तसेच सामाजिक संघटना किंवा संस्था याची या पुरस्काराची निवड करत असते.

डॉ. राहूल पाटील अध्यक्ष, पदाधिकारी व सहकारी यशोधन चारीटेबल ट्रस्ट यांनी ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक पर्यावरण आरोग्य तसेच विशेष रक्तदान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराप्रसंगी डॉ.राहूल पाटील यांनी हा पुरस्कार म्हणजे रक्तदान चळवळ देहदान चळवळ व अवयवदान चळवळ यात उस्फुर्त रित्या भाग घेणारे हजारो तरुण, वंदे मातरम परिवार ‘हेल्थ इज वेल्थ’ परिवार तसेच चोपडा शहरातील व तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व शैक्षणिक संस्था ज्यांच्यामुळे ही रक्तदान चळवळ अधिक यशस्वीरीत्या राबवली जात आहे. प्रति समर्पित करतो, अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र जाधव तसेच संस्थेचे पदाधिकारी व श्रोतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. डॉ.रामचंद्र देखणे यांच्याहस्ते ‘रक्त मित्र २०१९’ हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. राहूल पाटील, कांतीलाल पाटील, जुगल पाटील आदी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content