कोरोना : देशभरात २४ तासांत ६ हजार ६५४ नवे रुग्ण, १३७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे. देशात कोरोनामुळे ३ हजार ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६६५४ नवीन रुग्ण आढळले आहेत.

 

शुक्रवारी कोव्हिड-१९ मुळे मृत झालेल्या १३७ लोकांपैकी महाराष्ट्रात ६३, गुजरातमध्ये २९ आणि दिल्लीत १४ लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील एकूण प्रकरणं, ४४,५८२ पर्यंत पोहोचली आहेत, तर तामिळनाडूमध्ये १४,७५३ प्रकरणं नोंदवली गेली आहेत. हा सलग सहावा दिवस आहे जेव्हा महाराष्ट्रात २ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ लाख ९८ हजार १९७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जगभरातल्या ३ लाख ३९ हजार ४१८ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत. तर कोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २१ लाख ५६ हजार २८८ इतकी आहे.

Protected Content