चोपडा प्रतिनिधी । शहरातील बडगुजर पेट्रोल पंप शेजारील चंदगौरी नगर येथील रहिवाशी मूळ वेळोदे येथील व्यापारी सुगनमल गुलाबचंदजी जैन (वय-९१) यांचे आज सकाळी ११ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. ते वेळोदे येथील ललित क्लॉथ स्टोअरचे संचालक ललित जैन, चोपडा येथील महावीर ट्रेडिंग कंपनीचे संचालक नरेश जैन, आनंद स्वीटचे भूषण जैन यांचे आजोबा होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी ४.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
चोपडा येथील सुगनमल जैन यांचे वृध्दापकाळाने निधन
5 years ago
No Comments