भाजपा सरकारने देशाला जास्त कर्जबाजारी केले-अरूणभाई गुजराथी


चोपडा प्रतिनिधी । भाजपने देशाला तब्बल ४० टक्के जास्त कर्जबाजारी केल्याचे प्रतिपादन करून भाजपला पायउतार करण्याचे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केले. ते येथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित व्यापार्‍यांच्या मेळाव्यात बोलत होते.

या मेळाव्यात अरूणभाई म्हणाले की, आधी देशावर ५४ लाख कोटी रुपये कर्ज होते. त्या कर्जात भाजपा सरकार च्या काळात चक्क ४०% नी वाढ करून ८५ हजार कोटी रुपयाचे कर्ज करून ठेवले आहे. यामुळे फक्त पाच वर्षात कर्जाचा महाडोंगर आपल्या माथ्यावर या सरकार ने लादलेला आहे. हे सरकार पुढील पाच वर्ष सत्तेवर आल्यास कर्जाच्या डोंगर कित्येक पटीने वाढ होईल. या सरकार च्या काळात फक्त जाहिरात बाजीवर दहा हजार करोड रुपये खर्च केले गेले देशाला कर्जाच्या खाईत लोटून भाजपा सरकारचे सरकार स्थापनेचे मनसुबे व्यापारी वर्गाने हाणून पाडायला हवे असे आवाहन त्यांनी केले. या वेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड संदीपभैय्या पाटील, चोपडा पिपल्स बँकचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँगेस व्यापारी सेलचे तालुका अध्यक्ष नेमीचंद कोचर, सुरेश बापू पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी चंद्रहासभाई गुजराती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यापारी वर्गाकडून प्राध्यापक व्ही. एस.जैन यांनी आपल्या मनोगतातून नोटबंदीमुळे व्यापारी उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले.

Add Comment

Protected Content