पारोळा येथील प्रत्येक वार्डात होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

पारोळा प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता संसर्ग व तालुक्याच्या उंबरठ्यावर कोरोनाचा शिरकाव होत असल्याने पालिका व प्रशासन उपाययोजना करत आहे. नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी आणि आरोग्य सुदृढ रहावे यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या स्वखर्चाने शहरातील प्रत्येक प्रभागात होमिओपॅथी गोळयांचे वाटप केले जात आहे.

दिवसेंदिवस राज्यासह जिल्हयात कोरोना बाधितांती संख्खा वाढतांना दिसत आहे. सुदैवाने तालुक्यात अद्याप पर्यत कोरोनाचा शिरकाव झाला नाही. असे असले तरी खबरदारी म्हणून प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन नागरिकांनी सावधानता बाळगली पाहीजे. कोरोनावर अद्यापपर्यत तरी औषध सापडले नसून त्यावर मात करण्यासाठी ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली त्याला हा आजार होत नसल्याचे निर्दशनास आल्याने आयुष मंत्रालय भारत सरकारच्या मार्फत होमिओपॅथी गोळ्यांची शिफारशी नुसार नगराध्यक्ष व नगरसेवक हे स्वखर्चाने शहरात सर्वच प्रभागात नागरिकांना गोळ्या वाटप करण्यात येत आहे. हे औषध विनामुल्य असुन याचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत, फिजीकल डिस्टन्स पाळावे, गरजेनुसार बाहेर निघावे अश्या सुचना नगराध्यक्ष व नगरसेवक नागरिकांना देत असल्याने नागरिकात समाधान व्यक्त केले जात आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष करण पाटील, दिपक अनुष्ठान, भैय्या चौधरी, कैलास चौधरी, मनिष पाटील, बापु महाजन, मंगेश तांबे, प्रकाश महाजन, पी.जी. पाटील, अंजली पाटील, वैशाली पाटील, रेखा चौधरी, सुनिता वाणी, जयश्री बडगुजर, अलका महाजन, मोनाली राजपुत, वर्षा पाटील छाया पाटील यांचेसह करण पाटील मित्र मंडळ हे प्रभागात जावुन होमिओपॅथी गोळ्या देत कोरोनाबाबत जनजागृती करीत आहे.

Protected Content