यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्यावर उपसरपंच आणि सदस्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर लोकनियुक्त सरपंच यांना अपात्र करण्यासंदर्भात आज १८ ऑक्टोबर रोजी गावातील शाळेत मतदानाला सुरूवात झाली आहे.
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध सदस्य व उपसरपंच यांनी अविश्वास प्रस्ताव येथील तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दाखल केला होता. तेव्हा दिनांक ७ जुन २०२१ रोजी चुंचाळे ग्रामपंचायत येथे विशेष सभा बोलविण्यात आली होती व सरपंच पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव हा पारित झाला होता. तेव्हा लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर सदर अविश्वास प्रस्ताव हा ग्रामसभेतून देखील संमत होणे आवश्यक असते असा नियम आहे. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना या संदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या व त्या अनुषंगाने गावात आज १८ ऑक्टोंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलावुन अविश्वास संर्दभात मतदानाला सुरूवात झाली असुन मतदान करण्यासाठी येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत दोन मतदान केन्द्रावर प्रत्यक्षात मतदानाला सुरूवात झाली असुन, या मतदानात एकुण २ हजार ९२ हे मतदार या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे.
चुंचाळे गावातील शाळेतील मतदान केन्द्रा बाहेर ग्रामस्थांची मोठी गर्दी ही रांगेत दिसुन येत आहे .या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी व पिठासन अधिकारी म्हणुन कृषी अधिकारी पी.टी. देवराज हे असुन तेव्हा या ग्रामसभेच्या माध्यमातून अविश्वास प्रस्तावावर मतदान होत नागरीक ठरवतील सरपंच या पदावर राहतील का. तालुक्यात लोकनियुक्त सरपंच यांच्याविरुद्ध अशाप्रकारे अविश्वास झाल्यानंतर ग्रामसभेतून अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासंदर्भातील जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत स्तरावरील ही प्रथमच कार्यवाही असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळी पोलीस निरिक्षक सुधिर पाटील व पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस कर्मचारी यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला आहे .