डोंगरदऱ्यातून प्रवास करत डॉक्टरांचे पथक प्रथमच पोहचले तपासणीसाठी

यावल, अयुब पटेल । देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७३ वर्षांनंतर प्रथमच सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी डॉक्टरांना प्रथमच पहिले तेही त्यांच्या पाड्यात. किनगावच्या डॉ. मनीषा महाजन व त्यांच्या पथकाने ही किमया केली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सातपुडा पर्वतातील जंगलातून अरुंद पायवाट ,भर ऊन्ह आणि पाठीवर औषध भरून बॅग घेऊन जाणारी ध्येयवेडी डॉक्टर. भारत स्वातंत्र्यानंतर पाहिल्यांदा कुणीतरी डॉक्टर पोहचल ते पण थेट पायी प्रवास करून आणि ज्या आदिवासी बांधवांसाठी अन्न धान्य देऊन माणुसकी जपली आणि त्यांच्या या उपक्रमास साथ मिळाली ती निरभ्र निर्भय फाऊंडेशनची. शनिवार दि.१८ एप्रिल रोजी जेव्हा जग एकीकडे कोरोनाशी जैविक युद्ध लढत आहे. त्याच वेळेस स्वतःची जीवाची पर्वा ना करता फक्त माणुसकी हा धर्म पाळत स्वतःला झोकून काम करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन किंनगाव. साधारणतः ८५ किमी वर असलेले सग्यादेव आणि माथान हे सातपुडा पर्वत रांगामधील दोन आदिवासी पाडे. खरं तर इथे जायचं जरी म्हटलं तरी नुसत्या विचारांने घाम फुटेल…पण याच भयानक अश्या वाटेत आपल्या शब्द आणि कामाने प्रेरणा देणारे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन. आदिवासी पाडे किंनगावं गावापासून सुमारे ८५ किमी दूर पर्वत रांगामध्ये वसलेले आहे. किनगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना १९६४ साली झाली असून या केंद्रांच्या कार्यक्षेत्रात ही आदिवासी पाडे येतात. सगयदेव येथे जायचे ठरले तर सातपुडा पर्वत रागांमधून प्रवास करत रुईखेडापर्यंत आणि तेथून पुढचा अधिक खडतर प्रवास १० किमी चा पायी करावा लागतो. या जंगलातून जाताना अरुंद रस्ता पायवाट , डोक्यावर भर उन्ह , आणि पाठीवर औषधाची बॅग…. पाय घसरला तरी खोल दरीत माणुस पडू शकतो. त्यात जंगली प्राण्यांचा संचार, असे असताना सुद्धा डॉ. मनिषा महाजन यांनी कशाचा ही विचार न करता, सेवा देण्यासाठी कोणतेही दळणवळणाचे साधन नसताना पायी आणि काही प्रवास दुचाकीवरून खडतर प्रवास करत पाड्यावर पोहचल्या. आजवर कोणताच डॉक्टर या ३०० ते ३५० लोकसंख्या असलेल्या पाड्यावर कधी फिरकला नाही. डॉ.मनीषा महाजन यांनी व्यवस्थित नियोजन करून तेथे जाण्याचा ध्यास ठेवला आणि पोहचल्या देखील. स्वातंत्र्याच्या जवळपास ७३ वर्षांनंतर तेथील लोकांनी डॉक्टर पहिला. .डॉ. महाजन यांनी तेथे जाऊन लसीकरण, आरोग्य तपासणी आणि कोरोनाबाबत जनजागृती केली. त्याच वेळेस स्वयंसेवी संस्था निरभ्र निर्भयने फाऊंडेशन यांनी पाड्यांवर अन्न धान्य वाटप करून डॉ. मनीषा महाजन आणि त्यांची संपूर्ण टीम आणि निरभ्र निर्भय फाऊंडेशन रात्री ८.३० वाजता सुखरूप घरी पोहचले. आमच्यासाठी हीच अतिशय कौतुकास्पद आणि अभिमान वाटणारी गोष्ट आहे आणि आम्हाला अश्या अधिकारीचा अभिमान वाटतो असे किंनगावचे सरपंच टिकारांम चौधरी आणि इतर ग्रामस्थ यांनी सांगितले. अश्या वेळेस निरभ्र निर्भय फाऊंडेशनने आदिवासी बांधवांना धान्य वाटप करून मानवतेचे दर्शन घडविले. एक महिला डॉक्टर आणि निर्भयचे काम बघून आदिवासी बांधवाना अश्रू अनावर झाले. डॉ. महाजन आणि त्यांच्या संस्थेची कामाची लकब बघून यावल तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी गहू देऊन निर्भयला मदत केली. ही मदत आणि तेल तांदूळ , तूरडाळ, मीठ, साखर, बटाटे , कांदे , टमाटे ,आणि इतर वस्तू खडतर प्रवास करून सग्या देव येथे भारत स्वातंत्र्य नंतर जाणारी निर्भय फाऊंडेशन सुद्धा पहिली आणि एकमेव संस्था ठरली आहे .या कामासाठी आरोग्य सह्ययिका उषा पाटील, आरोग्य सेविका भावना वारके, मंगला सोनवणे ,शिला जमरा, आरोग्यसेवक जीवन सोनवणे ,विठ्ठल भिसे, शिपाई सरदार कानाशा आणि वाहनचालक कुर्बान तडवी ,आशा ताई नसरत तडवी आणि निरभ्र निर्भयचे कल्पेश महाजन ,जोंटी थॉमस, ग्रेस थॉमस उपस्थित होते. या कामगिरीसाठी डॉ. मनीषा महाजन आणि त्यांच्या टीमचे आणि निरभ्र निर्भय फाऊंडेशनचे कौतुक तहसीलदार जितेंद्र कुवर आणि प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले तसेच आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य आधिकारी यावल डॉ. हेमंत बऱ्हाटे आणि डॉ. दिलीप पोटोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सर्वांनी खूप कौतुक केले. किंनगाव येथील ग्रामस्थांनी देखील त्यांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करून त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

Protected Content