चीनने सोडले १० भारतीय जवान ; चर्चेनंतर घेतला निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मंगळवार रात्रीपासून ताब्यात असलेल्या १० भारतीय जवानांची चीनने सुटका केली आहे. या १० जवानांमध्ये ४ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे की, आज तीन दिवस चाललेल्या दोन्ही पक्षांकडील चर्चेनंतर मंगळवार रात्रीपासून चीनी सैन्याच्या ताब्यात असलेल्या १० भारतीय जवानांची चीनने सुटका केली आहे. दुसरीकडे लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत कोणताही जवान बेपत्ता झाला नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय लष्कराने गुरुवारी संध्याकाळी दिले होते. मात्र, आज १० भारतीय जवानांची चीनने सुटका केली आहे. या सुटकेबाबत भारतीय लष्कराकडून अधिकृतणे अजून काहीही सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. चकमकीतनंतर गेल्या तीन दिवसांपासून भारत आणि चीनच्या वरिष्ठ अधिऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठका झाल्या.

Protected Content