चिनी वैज्ञानिकांना कोरोना विषाणूची चित्रे तयार करण्यात यश

बीजिंग : वृत्तसंस्था । चिनी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूची प्रथमच चित्रे तयार केली आहेत. तो टोकेरी आकाराचा आहे. तो मानवी शरीरात गेल्यानंतर पेशींमध्ये होणाऱ्या बदलांबाबतचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे त्याचा खात्मा करण्यासाठी लस विकसित करण्यामध्ये मदत होत आहे.

हा खुलासा झाल्यानंतर आता लस आणि उपचार सापडण्यात मदत होईल अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. चीनमधील त्सिगुआ विद्यापीठातील बायोलॉजिस्ट डॉक्टर साई ली हंग्झहूमधील एका बायोसॅफ्टी प्रयोगशाळेत विषाणूतज्ञांसोबत काम करत आहेत. प्रयोगशाळेत विषाणू तयार करत आहेत.

ली आणि त्याच्या संशोधकांच्या टीमने विषाणूंनी भरलेला द्रव पदार्थ एका थेंबात टाकून तो गोठवला. नंतर त्याला क्रयो-इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपद्वारे पाहिले. ली यांनी सांगितले की, विषाणू हा एक इंचाच्या दहा लाखाव्या भागापेक्षा कमी आहे. विषाणूला इतक्या जवळून पाहणारा मी पहिली व्यक्ती असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे विषाणू मानवी पेशींत कशाप्रकारे शिरकाव करतात, हे समोर आले आहे.
करोना विषाणू कसा थैमान घालतो?

कशाप्रकारे दूषित जीन्स मानवाच्या बायोकेमिस्ट्रीवर परिणाम करतात याचीही माहिती शास्त्रज्ञांना मिळाली आहे. काही व्हायरल प्रोटीन जीव पेशींवर हल्ला करतात आणि अन्य नवीन व्हायरस तयार करण्यासाठी पोषक वातावरण तयार करतात. विषाणू कशाप्रकारे थैमान घालतो, हे यामुळे लवकरच स्पष्ट होण्यास मदत मिळणार असल्याचे समजते.

Protected Content