चिनावल शिवारात केळीचे नुकसान; सावदा पोलीसात तक्रार दाखल

सावदा, प्रतिनिधी |  चिनावल शिवारात अज्ञात चोरट्यांनी केळीचे घड कापून नुकसान केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

याबाबत तक्रारीनुसार, शशिकांत पांडुरंग महाजन (वय ६१ धंदा शेती रा. मराठी शाळेजवळ रोझोदा ता. रावेर) यांचे चिनावल शिवारात खिरोदा चिनावल रस्त्यावरील लांडगे नाल्याजवळ शेत आहे. त्यांच्या या शेतातील केळीचे घड सोमवार दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ वाजता मोटर सायकल (क्र. MH19/B5/6049) वरील दोघा अज्ञात व्यक्तींनी 600 रु किमतीचे केळीचे ३ घड कापुन फेकुन नुकसान केले आहे. याबाबत सावदा पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content