टिपू सुलतान यांच्याबद्दल अपशब्द; देवेंद्र फडणवीसांवर कारवाईची मागणी

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | इंग्रजाविरुद्ध लढणारे भारतीय शहीद थोर स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्यां देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध कडक कारवाईची मागणी बहुजन मुक्ती पार्टीने निवेदनाद्वारे केली आहे.

भारतीय थोर स्वतंत्र सेनानी पहिले मिसाईलमॅन व इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होणारे थोर स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केला. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात एकमेव भारतीय राजा जे अखंड भारताच्या एकतेचे प्रेरणास्त्रोत आणि अभिमान आहे. अशा भारत मातेचा वीर पुत्र टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमानजनक व द्वेषपूर्वक विधान करून राज्यातील शांतता,कायदा व सुव्यस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात करू असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टीने केले आहेत.

निवेदनावर जुबेर अली (शहर मुस्लिम मोर्चा), प्रमोद सौदळे (बहुजन मुक्ती मोर्चा), इरफान बागवान (शहर मुस्लिम मोर्चा), हाफिज वहाब (शहर मुस्लिम मोर्चा), जाकीर जमदार (शहर मुस्लिम मोर्चा), हकिम चौधरी (मनियार बिरादरी अध्यक्ष), सामाजिक कार्यकर्ते शकुर जमादार, आजिज खान (शहर मुस्लिम मोर्चा), इमान खान, मजीत बागबान, इश्क खान व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content