भुसावळात नोकरीचे आमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील खडका रोड भागातील रहिवासी जावेद रफिक तडवी यांच्याकडून (दि.१८/७/२०१३ ते १५/१२/२०१३) दरम्यान आरोपी फिरोज सिकंदर तडवी यांने सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ९ लाख ३० हजार रुपये फसवणूक केल्याबद्दल बाजारपेठ पोलीस स्थानकात आज (दि.१५ सप्टेंबर २०२०) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावेद रफिक तडवी यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी फिरोज सिकंदर तडवी आर.एम.एस. कॉलनी शिरपूर कन्हाळा रोड भागातील रहिवाशी असून त्यांचे हे राहणार लक्ष्मी नारायणनगर विवेकानंद शाळेसमोर भुसावळ येथील असून आरोपीचे वडील सिकदंर मेताब तडवी हे तहसिलदार व उप-जिल्हाधिकारी असल्याचे सांगून त्यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील मुख्य अध्यापक यांचेशी ओळख असल्याचा विश्वास देवुन फिर्यादी जावेद रफिक तडवी (रा.नेमाडे कॉलनी,पाटील नर्सरी जवळ खडका रोड भुसावळ) व त्यांचा भाऊ सलिम रफिक तडवी अशांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ९,३०,००० रुपयांची फसवणूक केली म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधीही आरोपीविरुद्ध फिर्यादी कनिस बी.रज्जाक मणियार वय ४० मुस्लिम कॉलनी भागातील महिलेचा पती मयत झाल्याने त्याच्या नावावर असलेले एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्सचा पॉलिसी २९ लाखांचा क्लेम मंजूर करून देण्यासाठी ९ लाख घेऊन प्रत्यक्षात कोणताही क्लेम मंजूर करून न देता फसवणूक केली तसेच फिर्यादिस २९ लाखांचा बनावट चेक देऊन फसवणूक केली म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन २२/२०१८ भा.द.वि. कलम ४२०,४६७,४६८,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल असून दिनांक ३१जुलै २०२० रोजी आरोपीस अटक करण्यात आली असून चार दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

सदर आरोपीने भुसावळ शहरातील काही लोकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन फसवणूक केली बाबत चौकशी होण्याबाबत विनंती केली आहे.तसेच फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आले आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश गोटला व पोना किशोर महाजन करीत आहे.असे सरकारी नोकरी लावणारी टोळी भुसावळातील विठ्ठल मंदिर वार्डात सक्रिय असून एम.ए.सी.बी.तसेच महिला बाल संगोपन केंद्रात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ह्या टोळीने अनेकांची फसवणूक केली आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!