चित्रा चौकातून शेतकऱ्यांची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील चित्रा चौकातून ६० वर्षीय शेतकऱ्याची ६० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री शहर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

या संदर्भात माहिती अशी की, प्रदीप शामराव देशमुख (वय-६१) रा. हरी ओम नगर, जुना कानळदारोड, शिवाजी नगर हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीटी २११९) क्रमांकाची दुचाकी आहे. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास प्रदीप देशमुख हे चौत्रा चौकात दुचाकीने कामानिमित्त आले. चौकातील विशाल ईलेक्ट्रिक दुकानासमोर पार्किंग करून लावली होती. अवघ्या १० मिनीटात अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी पार्किंगच्या ठिकाणाहून चोरून नेली. प्रदीप देशमुख यांनी दुचाकीचा शोध घेतला परंतू आढळून आली नाही. याप्रकरणी शनिवारी ८ जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.

Protected Content