मुंबई वृत्तसंस्था । राज्यात करोनाबाधितांची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यात ४७२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन एकूण रुग्ण संख्या ४ हजार ६७६ वर पोहचली आहे. तर आणखी ९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. याबरोबरच आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २३२ वर पोहचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील झोपडपट्टींसाठी स्थानिक बिल्डर्स जबाबदार- रतन टाटा
महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७६ हजारांच्या वर चाचण्या केल्या असल्याचंही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आत्तापर्यंत राज्यात २३२ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला. ही बाब चिंतेची आहे, मात्र हा मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच, महाराष्ट्रात आजपर्यंत ५०७ रुग्ण हे करोनामुक्त झाल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे. करोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका असंही आवाहन त्यांनी केलं आहे. करोनाची लक्षणं लपवणं अत्यंत चुकीचे आहे.
खनिज तेलाची ऐतिहासिक घसरण; कच्च्या तेलाचे भाव शून्याखाली
राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ही सध्या ७ दिवसांनी दुप्पट होते आहे. हे प्रमाण आपल्याला १५ ते २० दिवसांपासून आणायचं आहे. हळूहळू हे प्रमाणही संपवायचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. २८ दिवसांनी नव्याने पेशंट न वाढल्यास तो भाग ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात येईल. १४ दिवसात नवा रुग्ण न आढळल्यास तो ऑरेंज झोन जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
संचारबंदी : यावल येथे पोलीस प्रशासनाच्या मदतीला माजी सैनिक सरसावले