चाळीसगाव अलायन्स चर्चमध्ये नाताळानिमित्त कार्यक्रम

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील दि इव्हॅनजेलीकल अलायन्स चर्चमध्ये नाताळानिमित्त आज धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती लाभली.

दरवर्षी जगभरात क्रिसमस अर्थात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने चाळीसगाव शहरातील दि इव्हॅनजेलीकल अलायन्स चर्चमध्ये नाताळानिमित्त शनिवार रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. धर्मगुरू रेव्ह अनिल एसू जामनीक आणि पंच मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज बांधव सदर कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी चाळीसगाव शहरांसह तालुक्यातील विविध ठिकाणांहून १५० हून अधिक समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दरम्यान चर्च स्थापन झाल्यापासून सातत्याने नाताळाच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने सण उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा सावट असल्याने नियमांचे पालन करून सण साजरा करण्यात येतो आहे.

Protected Content