चाळीसगाव प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वसुंधरा फाउंडेशनतर्फे प्रतिमा पुजन आणि वसुंधरा रत्न पुरस्कार २०२० वितरण समारंभ उद्या १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता येथे अरिहंत मंगल कार्यालय येथे आयोजित आला आहे.
यांची राहणार उपस्थिती
यावेळी खा.उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण, माजी आमदार राजिव देशमुख, पं.स. सभापती अजय पाटील, पं.स. उपसभापती सुनिल पाटील, कृउबा माजी सभापती रमेश चव्हाण, संभाजी सेना संस्थापक लक्ष्मण शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिलीप घोरपडे, रयत सेना संस्थापक गणेश पवार, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उमंग शिल्पी महिला परिवार संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील, महिला आयोग सदस्या देवयानी ठाकरे, सिध्दी महिला मंडळ अध्यक्ष डॉ. उज्वला देवरे, जिजाऊ महिला मंडळ संस्थापिका मनिषा पाटील, जिजाऊ जयंती उत्सव समितीच्या सोनाल सांळुंखे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व सन्माननीय नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वसुंधरा फाउंडेशन अध्यक्षा धरती पवार, सचिव सुनील भामरे, कोषाध्यक्ष देवेन पाटील, उपाध्यक्ष संजय पवार, सहसचिव गजानन मोरे, संचालक रविराज परदेशी व सचिन पवार यांनी केले आहे.