चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्याने आजवर कोरोनाच्या संसर्गाला थोपवून धरले असले तरी आता जामडी येथील एक महिला कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले असून या माध्यमातून चाळीसगावात कोरोनाची एंट्री झाली आहे.
जगभरात कोरोनाचा हाहाकार उडालेला असतांना चाळीसगावात आजवर या विषाणूची बाधा झाली नव्हती. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनतेने एकोप्याने लॉकडाऊनचे बर्यापैकी पालन केल्याने या तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. तथापि, तालुक्यातील जामडी येथील महिला कोरोना बाधीत असल्याच अहवाल रात्री उशीरा आल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला भडगाव येथील कोरोना बाधीताचा अंतिम संस्काराला उपस्थित राहिली होती. या महिलेसोबत अंत्यंसस्काराला उपस्थित राहिलेले १४ अन्य जण देखील कोरोना बाधीत असल्याचा अहवाल रात्री आला आहे.
दरम्यान, जामडी येथील महिला बाधीत असल्याची माहिती समोर येताच प्रशासनाने संबंधीत महिलेच्या निवासाचा परिसर सील करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर जनतेने घाबरून न जाता लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.