चाळीसगावात काँग्रेसवाडी ते जिनगरवस्तीला जोडणाऱ्या कामाचे भूमिपूजन

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील काँग्रेसवाडी ते जिनगर वस्तीला जोडल्या जाणारा नवीन रस्त्याचे भूमिपूजन आज या प्रभागाच्या नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

शहर विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत नाना देशमुख, डॉ. हरीश थवे, आरोग्य सभापती रोशन जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा शिवसेना तालुका प्रमूख रमेश आबा चव्हाण, माजी नगरसेवक प्रदीप निकम आर्की, प्रशांत देशमुख  यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या भागातील नागरिकांचा गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी संघर्ष व आग्रह पाहता माजी उपनगराध्यक्ष रमेश आबा चव्हाण व विद्यमान उपाध्यक्षा आशाबाई चव्हाण यांच्या प्रयत्नातून नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेतून या रस्त्याच्या कामाला आज अनेक तांत्रिक अडचणी पूर्ण करीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.  काँग्रेसवाडी जिनगर वस्ती या भागास जोडणारा एकही रस्ता या परिसरामधून कुठेही नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या अखेर जुन्या रांजणगाव रस्त्याचा उपयोग करून त्याद्वारे हा रस्ता जोडण्यात येत आहे. यासाठी प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोरपडे यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा  केला होता. आज भूमिपूजन झाल्यानंतर या भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.  अनेक वर्षाच्या प्रलंबित मार्गाच्या कामाला  आज सुरुवात झाली असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.  याप्रसंगी लक्ष्मण आप्पा बोराडे, प्रभाकर उगले, वाल्मिक बोराडे, संतोष  गायकवाड, अनिल कुडे, प्रशांत शिंदे, संजय धर्मा राठोड, अशोक बोराडे, सुनील गायकवाड, लाला भोई, दिनेश घोरपडे, संतोष राठोड, गौरव घोरपडे, गणेश राठोड, अशोक राठोड, मनोज कोळी, ललित कापडणे, बालाजी कोळी, विकास राठोड, निलेश राठोड, अजय घोरपडे व या भागातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content